लांजा : आंजणारी घाटात ऑईलवाहू टँकर कलंडल्याने वाहतूक दीड तास विस्कळीत

banner 468x60

मुंबई ते गोव्याच्या दिशेने जाणारा ऑईलवाहू टँकर कलंडल्याने मुंबई- गोवा महामार्गावर सर्वत्र ऑईल पसरले होते. त्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणचा मार्ग निसरडा बनला होता. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती.

हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी घाटात तीव्र उतारावर बुधवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या दरम्यान घडला. टँकरमधील ऑईल महामार्गावर वाहून गेल्याने वाहतूक मंदगतीने सुरू राहिली होती. दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

मुंबईकडून गोव्याच्या दिशेने ऑइल घेवून जाणारा टँकर 6.15 वाजण्याच्या दरम्यान आंजणारी घाटाच्या तीव्र उतारावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. तीव्र उतार व अवघड वळणावर असल्याने टँकर रस्त्याच्या कडेला जावून कलंडला. यावेळी ऑईलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होवून ते महामार्गावर पसरले होते.

थोडा अंधार असल्याने ये जा करणार्‍या वाहनांना अंदाज न आल्याने ऑईलवरुन वाहने जात होती. वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण होण्याची दक्षता म्हणून वाहनांची गती मंदावली होती.

महामार्गावरून जाणार्‍या एका रिक्षाचालकाने घटनास्थळी थांबून टँकरमध्ये अडकलेल्या टँकर चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर या अपघाताची माहिती लांजा पोलिसांना देण्यात आली. दीड तासांनी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *