गुहागर,नरवण – विशाल मोरे गुहागर तालुक्यातील नरवण गाव मधील 2018 पासून BSNL Mobile टॉवर नरवण धरणवाडीच्या मध्यभागी ज्यामुळे सर्व गावांमध्ये मोबाईलची रेंज मिळेल हि संकल्पना होती.
नरवण हि 10 ते 12 गाव आणि अनेक वाड्यांना जोडनार नेटवर्क नरवण , तवसाळ, कर्दे, मुसलोंडी, चिंद्रावळे , दोडवली, मासु,जांभारी, काताळे, साखरी आगर, हेदवी, वाघांबे जोडनारी मुख्य बाजारपेठ आहे.
डॉक्टरांना संपूर्ण साधण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही, अत्यावश्यक मेडिकल, घरातील किराणा माल, भाता चक्की, लाकडे कापण्याची स्वामील, मुंबई पुणे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था तर देव दिपावली निमित्त रत्नागिरी जिल्हा गुहागर तालुक्यातील मोठी बगाडा जत्रा भरते येथे मुंबई पुणे भाविक मोठ्या संख्येने येतात.
सर्वांना मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते. महावितरण कंपनीचे लाईट गेल्यावर बॅटरी 🔋 व्यवस्था नाही आहे.
यासाठी कायमस्वरूपी सौरऊर्जा चे लाईट व्यवस्था केली जावी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण भागात फायबर ऑप्टिकचे सुपर फास्ट नेटवर्कर जाळे विणण्याचे उद्दिष्ट ग्राम पंचायत सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घेता येईल. पण अमलात आणली गेली नाही.
Jio/ airtel internet connection केबल जमिनीतुन टाकलं पण ते त्या जोडल्या नाही. करोडो रुपये खर्च करून ते टॉवर उभे आहेत.
तर नरवण गाव बाजारपेठ संपर्क साधायचा प्रयत्न केला तर दोन दिवस तर कर महिना भर नेटवर्क नसतं Digital व्यवहार करताना खुप अडचणी येत आहेत.
अनेक गुहागर सबस्टेशन संपर्क वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.
मोबाईल टॉवर उभारून महिन्यातुन 8/10 पण चालत नाही अशी नरवण गावचे स्थानिक ग्रामस्थ विशाल मोरे यांनी माहिती दिली.
नरवण ते जयगड टॉवर ला वायरलेस कनेक्ट करतो असे वारंवार फक्त सांगत अधिकारी दुर्लक्ष करत आहे. या ग्रामीण भागातील नेटवर्कचा समस्या वरती तोडगा काढावा हि विनंती स्थानिक ग्रामस्थ व दुकानदार करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













