गुहागर : पाटपन्हाळे महाविद्यालयात बँक राष्ट्रीयकरण दिन उत्साहात संपन्न

banner 468x60

तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र व ग्रामीण विकास विषयाच्या वतीने बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता बँक राष्ट्रीयकरण दिनाचे औचित्य साधून व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.


👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

यासाठी मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मार्गताम्हाने चे शाखाधिकारी रोहित भोसले लाभले होते त्याचबरोबर त्यांचे सहकारी जंगम हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णाजी शिंधे यांनी शाखाधिकारी रोहित भोसले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आपल्या मार्गदर्शन व्याखानामध्ये बँकाच्या राष्ट्रीयकरणाची गरज, बँक राष्ट्रीयकरण, त्याचे परिणाम, बँक व्यवसायाचे प्रचलीत प्रवाह, नवीन आर्थिक धोरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा आढावा घेतला त्याच बरोबर बँकाच्या विविध योजना विषयी माहिती दिल.

तसेच या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बँकाच्या विविध योजनांचा पालकांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले.

  या कार्यक्रमास महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेचे प्रमुख सर्वश्री प्रा.प्रमोद देसाई आणि डॉ सुभाष खोत,IQAC समन्वयक प्रा. लंकेश गजभिये, इतिहास विभाग प्रमुख डॉ प्रसाद भागवत आणि मराठी विभाग प्रमुख डॉ जालिंदर जाधव आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात ७५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

 या कार्यक्रमा नंतर शाखाधिकारी भोसले यांनी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना बँकाच्या योजनेविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *