चिपळूण येथील जंक्शन रेल्वे स्टेशनवर फलाट क्र.१ वर पूर्वीप्रमाणे गाड्या थांबवाव्या,
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या मागणीला येथील पोलिसांनी प्रतिसाद दिला असून काल सोमवारी चिपळूण पोलिसांनी रेल्वेच्या रिजनल
मॅनेजरला लेखी पत्र देऊन फलाट क्र.१ वरच सर्व गाड्या व रेल्वे स्टेशनबाहेर रुग्णवाहिका थांबविण्याची सूचना केली आहे.आता गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार
आहेत.चाकरमान्यांची रेल्वेला अधिक पसंती असल्याने गाडी फलाट क्रमांक २ वर थांबली,तर बरोबर आणलेले सामान,मुलं,ज्येष्ठ नागरिक पटरीवरुन चालू लागले,तर अपघात होऊ शकतो.हेअत्यंत धोकादायक असल्याने पूर्वीप्रमाणे फलाट क्र.१ वर गाडी थांबवावी,अशी मागणी
श्री.मुकादम यांनी केली होती.या मागणीचे वृत्त प्रसिद्ध होताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या.त्यानुसार काल पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर यांना पत्र दिले असून उपविभागीय अधिकारी चिपळूण,तहसिलदार,शौकत मुकादम,स्टेशन मास्तर व आर.पी.एफ.चिपळूण कोकण रेल्वे यांना माहितीसाठी प्रत दिली आहे.या पत्राबद्दल मुकादम व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*