भाजपला स्थानिक पातळीवरही सन्मान व त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय मिळत नाही. जलजीवन मिशन केंद्र व राज्य दोन्ही सरकारचा उपक्रम आहे.
त्याचेदेखील श्रेय एकटे योगेश कदम (Yogesh Kadam) लाटत आहेत. जलजीवन मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे; परंतु योगेश कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही जलजीवन मिशनच्या कामाची उद्घाटन व भूमिपूजन करताना घेत नाहीत, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कदम यांच्याविरोधात भाजपने प्रथमच जाहीर नाराजी व्यक्त केली. कदम सातत्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलत असल्याने खेड येथील भाजप कार्यालयात पत्रकार बोलावली होती.
मोरे म्हणाले, ‘‘अनेक कामांची भूमिपूजने व उद्घाटने आमदारांनी केली. त्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर व आमदार प्रसाद लाड यांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या कामांचीदेखील भूमिपूजने व उद्घाटने त्यांनी केली. ही कामे भाजपमार्फत मंजूर करून आणली आहेत तरी त्या विकासकामांचे आमदार योगेश कदम यांनी श्रेय घेण्याचे कारण काय.
याबाबत पक्षाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार आहे.’’ मोरे म्हणाले, ‘‘कदम यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय त्यांनी नक्की घ्यावे, त्यांच्या मंजूर कामांच्या पाट्यांवर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची नावे लावावीत. परंतु भाजप विकासकामे करत असेल तर त्याचे श्रेय त्यांनी घेण्याचे कारण काय.
आमदार योगेश कदम यांना भाजप- शिवसेना युती आल्याचा विसर पडला आहे.’’ या वेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, सरचिटणीस शशांक सिनकर व पदाधिकारी उपस्थित होते. योगेश कदम गेल्या दीड वर्षांपासून भाजप सोबत युती आहे हे मानतच नाहीत.
यापूर्वी मंडणगड व दापोलीमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कदम यांच्याकडून भाजपला स्थानिक पातळीवर सन्मान व केलेल्या कामांचे श्रेय न मिळाल्यास आगामी कालावधीत होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये युती म्हणून काम करायचे की कसे याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविणार आहोत, असे ऋषिकेश मोरे म्हणाले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















