दापोली : खासदार सुनिल तटकरेंना योगेश कदमांची साथ

banner 468x60

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्यात कोंडी करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रचला आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना तटकरेंनी सोबत घेतल्याचे चित्र सध्या तयार झाले आहे.दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. यावेळी माहिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार योगेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि दोन्ही पक्षातील महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ मिळणारे हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते.

तेव्हा पालकमंत्री बदला, असा पवित्रा गोगावले यांनी घेतला होता. याचबरोबर काँग्रेस आणि भाजपनेही अशीच मागणी लावून धरली होती. यात महत्वाची भूमिका ही भरत गोगावले यांची होती. याचीच सल राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या मनात आहे.

म्हणून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोगावले यांना लक्ष्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार आहे. रायगडचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे सरकारमध्ये मंत्री आहेत.

दरम्यान भरत गोगावले यांना सरकारमध्ये मंत्रीपद न दिल्याने नाराज असल्याच्या बातम्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्री पदावरून अधिवेशनात टोला लगावला होता. ते म्हणाले होते, भरत गोगावले यांना एकदाचे मंत्री करा, नाहीतर त्यांनी शिवून घेतलेल्या सुटाला उंदीर लागतील. त्यामुळे भविष्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तटकरे गोगावले यांची राजकीय कोंडी करणार हे निश्चित मानले जात आहे.

मात्र तटकरे यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना बरोबर घेतल्यामुळे आमदार कदम यांना मोठा आधार मिळाला आहे.कोट महायुतीचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत एकत्र काम करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. मुंबईत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच जागा वाटप ठरेल.- सुनील तटकरे, खासदार

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *