रत्नागिरीत शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन गटांत वाढदिवसाचा बॅनर काढल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. माजी सरपंच संदीप ऊर्फ बावा नाचणकर आणि त्यांच्या भावाला जमावाने मारहाण केली. त्यात एकाने संदीप नाचणकर यांच्या डोक्यात चॉपरने वार केल्याने ते जखमी झाले आहेत.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या राड्यामुळे रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. बॅनरवरून राडा झाला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून हा वाद उफाळून आल्याचे चर्चिले जात आहे.
(Clash between two factions of Shinde Shiv Sena in Ratnagiri) रत्नागिरीत अनेक ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेतच दोन गट पडलेले आहेत. त्यातील मिरजोळे या गावाच्या पाटीलवाडी येथील काही तरुणांनी वाढदिवसाचा बॅनर मुख्य रस्त्यावर लावला होता.
माजी सरपंच संदीप नाचणकर यांनी तो बॅनर सायंकाळी काढला. पण का काढला म्हणून वाद झाला. पण तो वाद सामोपचाराने मिटविण्यात आला हेाता. मात्र, संदीप नाचणकर यांना काही तरुणांनी बुधवारी रात्री एमआयडीसीतील मजगाव रोड येथील मुख्य रस्त्यावर बोलावले.
त्या तरुणांनी बॅनर का काढला म्हणून नाचणकर यांच्याशी वाद घातला. दरम्यानच्या काळात पाटीलवाडीतील मोठा जमाव नाचणकर यांच्या दिशेने आला. त्याचेवळी संदीप यांचे भाऊही त्या ठिकाणी आले होते. त्याचवेळी जमावातील एकाने नाचणकर यांच्यावर हल्ला करा, असे सांगताच जमावाने त्या दोघांनाही मारहाण केली.
संदीप नाचणकर यांच्या डोक्यात एकाने धारदार चॉपरने वार केला. त्यात संदीप नाचणकर जखमी झाले. संदीप नाचणकर यांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी संदीप कृष्णा नाचणकर यांनी तक्रार दिली.
तक्रारीवरून संशयित रत्नदीप पाटील, अभी पाटील, वैभव पाटील, हर्षराज पाटील व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या मारहाण प्रकरणी हर्षराज सुभाष पाटील यांनीही तक्रार दिली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*