टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडाघातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या प्रकरणीरत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला.
तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावरपैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंकखाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली.
त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगूनसुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूककेली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार १० ऑगस्टराेजी भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल केलाआहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*