संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे अंगावर उकळते पाणी पडून उपचारादरम्यान तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ओवी किंजळे असे या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. संंगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवी त्यांच्या शेजारी राहणार्या आरती किंजळे हिच्या घरी खेळायला गेली होती.
त्यांच्या येथे गरम पाणी ओवी हिच्या अंगावर पडल्याने ती भाजली होती. तिला तात्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक औषध उपचार करून घरी सोडण्यात आले.
त्यानंतर तिची तब्येत जास्त बिघडल्याने तिला रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यास सांगितले.
मात्र सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे राजेश शेलार करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















