राज्यातील 35 टॉप शाळांमध्ये रत्नागिरीतील दोन शाळा

banner 468x60

शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २,१३० शाळेतील ६४,९६७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या लाखो शाळांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप शाळांमध्ये १०० शाळांची निवड करण्यात येणार आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

आत्तापर्यंत निवडण्यात आलेल्या टॉपच्या ३५ शाळांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश आहे. गुहागर व खेड तालुक्यातील या शाळा आहेत.

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ३८ लाख विद्यार्थी आमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राला कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करणार आहेत.

या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील लाखो शाळांमधून १०० टॉप शाळांची निवड करण्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाने आत्तापर्यंत राज्यातील ३५ टॉप शाळांची निवड केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद कुडली शाळा क्रमांक ४ आणि खेड तालुक्यातील भडगाव येथील आर. डी. ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळांचा समावेश आहे.

लवकरच राज्यातील आणखी टॉपच्या ६५ शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी काही शाळांचा समावेश असेल, अशी आशा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *