शहरातील ओसवालनगर येथील उतारात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह 5 विद्यार्थी जखमी झाले.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
ही घटना बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. जखमी रिक्षाचालकाला जिल्हा शासकीय रूग्णालय येथे तर मुलांना रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. सईदअली फणसोपकर (वय-62 रा अजमेरीनगर मजगांव रोड,रत्नागिरी)असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फणसोपकर हे आपल्या ताब्यातील रिक्षाने विद्यार्थ्यांची वाहतूक करतात.
बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास ते एम.डी.नाईक हायस्कूल उद्यमनगर येथील मुलांना घेवून जात होते. यावेळी ओसवालनगरमधील उतारामध्ये सईदअली फणसोपकर यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याकडेला उलटली. या अपघातात रिक्षाचालक सईदअली यांच्यासह 5 विद्यार्थ्यांना दुखापत झाली.
सईदअली यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.तर विद्यार्थ्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नेंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला,अशी माहिती त्याने पोलीसांजवळ दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*