रत्नागिरी : 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीक नाणीज येथून शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी ही नाणीज हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिकायला होती. ती (दि-14) सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जातो असे सांगून घरातून बाहेर पडली.

दरम्यान संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिच्या आईच्या मोबाईलवर शाळेतील मैत्रीणीने फोन केला व मुलीबाबत विचारपूस केली. आपली मुलगी शाळेत पोहोचली नाही हे आईच्या लक्षात आले.

यानंतर मुलीची आई आणि तिच्या भावाने नाणीज हायस्कूल,नाणीज परिसर, पाली इत्यादी ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुलीच्या आईने अजून एका शाळेतील मैत्रिणीकडे चौकशी केली असता आम्ही दोघीजणी शाळेच्या गेटपर्यंत एकत्र गेलो, मात्र शाळेत न येता ती तिथून एकटीच कुठेतरी निघून गेली.

ती कोठे आणि कोणासोबत गेली याबाबत मला काहीच माहिती नाही असं त्या मैत्रिणीने सांगितले. यानंतर देखील मुलीची आई आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, त्यानंतर देखील त्यांना तिचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही.यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठत अपहरण झाल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *