देवरूख : सप्तलिंगी नदीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

banner 468x60

पूर गावातील सप्तलिंगी नदीत रविवारी २ तरुण बुडाले होते. त्या ठिकाणी मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आले होते. या जाळ्यात सचिन झेपले यांचा एक पाय अडकलेला होता.

banner 728x90

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

सोमवारी दुपारी हे जाळे ओढत असताना ग्रामस्थांना ते जड जाणवले. जाळे वर ओढले असता झेपले यांचा मृतदेह त्यात असल्याचे आढळल्याने देवरूख पोलिस ठाण्यात कळवण्यात आले.

देवरूखजवळील पूर गावातील दोन सख्ख्या भावांचा सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १०) दुपारी दोनच्या दरम्याने घडली होती.

यातील गणेश रामचंद्र झेपले यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी सापडला, तर सचिन झेपले (३२) हे बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह कुडवली + बौद्धवाडी येथे सोमवारी दुपारी मिळाला. देवरूख ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार व सहकारी यांनी कुडवली येथे जाऊन पंचनामा केला.

देवरूख येथे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.गणेश झेपले हे अविवाहित होते. रविवारी दुपारी सचिन झेपले पत्नीसह कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. या वेळी सचिन झेपले हे पोहण्यासाठी नदीत उतरले. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला; मात्र जवळपास कोणी नव्हते. यामुळे तिने धावतच घरी जाऊन दीर गणेश झेपले यांना हा प्रकार सांगितला.

भावासाठी लगेचच गणेश झेपले यांनी पाण्यात उडी मारली; पण दुर्दैवाने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने पूर गावावर शोककळा पसरली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *