रत्नागिरी :- महिला ग्राहकाच्या आधारकार्डमध्ये फेरबदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्स कंपनीतून १ लाख १० हजारांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे .
कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwEचैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
फसवणूकीच्या पैशातून त्याने चक्क मोबाईल घेतला . याप्रकरणी राहुल बबन पाटील यांनी फिर्याद दिली आहे . सुशांत कोडोलकर हा रत्नागिरीतील बजाज फायनान्स कंपनीत पूर्वी कामाला होता .
त्याला सध्या कंपनीतून बडतर्फ
करण्यात आले. या कंपनीतील एका जुन्या महिला ग्राहकाच्या आधारकार्डवरील मूळ पत्त्यावरील जिल्हा व पिनकोड बदलून सुशांत याने त्या ठिकाणी सांगली जिल्हा व पिनकोड ४१६३०१ असा टाकला .त्यानंतर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे आष्टा ( जि . सांगली ) येथील एका मोबाइल दुकानातून १ लाख १० हजारांचा तेवढ्या किमतीचा मोबाइल खरेदी करण्यासाठी त्याने स्वतःचा आयडी वापरून १ लाखाचे कर्जप्रकरण केले . त्याचे दोन हप्ते त्या महिलेच्या बँक खात्यातून कट झाले . बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने हे कर्जप्रकरण केल्याचे लक्षात येताच बजाज फायनान्सचे राहुल पाटील यांनी फसवणूकीची तक्रार दिली . या तक्रारीत त्यांनी सुशांत कोडोलकर याने स्वतःचा आयडी वापरून १ लाख १० हजारांचे कर्ज घेऊन बजाज फायनान्स कंपनीची व महिला ग्राहकाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे . त्यानुसार पोलिसांनी सुशांत कोडोलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*