रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरचे भरदिवसा अपहरण करून त्यांच्याकडून १० लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी (ता. करवीर) येथील म्होरक्यासह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दवाखान्यात बेकायदा गर्भलिंग चाचणी करीत असल्याची आपल्याविरुद्ध तक्रार असल्याचे खोटे सांगून टोळीने संबंधित डॉक्टरना ब्लॅकमेल केल्याचेही पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
मुख्य संशयित रवींद्र आबासाहेब पाटील ( वय ४२, रा. पाटाकडील गल्ली, वाशी, ता. करवीर), सुयोग सुरेश कार्वेकर (३८, सावकार गल्ली, इंद्रायणीनगरजवळ, मोरेवाडी, करवीर) व सुमीत विष्णू घोडके (३३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, करवीर) ता. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
डॉ. सुभाष अण्णाप्पा डाक (५५, रा. कणेरी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या निर्देशांनुसार, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पथकाने कसबा बावडा रोडवरील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सापळा रचून डॉ. डाक यांची सुखरूप सुटका करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
गुन्ह्यात वापरलेली आलिशान मोटार, पोलिसांची निळी गोल कॅप, भारत सरकार व गव्हन्मेंट ऑफ इंडिया अशी अक्षरे असलेली पाटीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















