रत्नागिरी : कशेडी घाटातील प्रवास होणार सुस्साट, बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार

banner 468x60

रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, गणेशोत्सवापूर्वी ही एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यामुळे घाटाचे अंतर १० मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे. कशेडी घाटातील अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागतो.

तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत. त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय साडेसात किलो मीटर अंतर कमी होणार आहे.


मुंबईकडे येण्यासाठी आणि कोकणात जाण्यासाठी असे २ स्वतंत्र बोगदे आहेत. दोन किलोमीटरच्या बोगद्याला दोन्ही बाजूचे जोड रस्ते धरून हा सगळा मार्ग ११ किलोमीटरचा आहे. या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कशेडी घाटातील चौपदरीकरणाचे अवघड काम या बोगद्यामुळे उत्तम पर्याय देत पूर्णत्वाकडे जात आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले. डिसेंबर २०२३पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे.


महामार्ग ते बोगदा जोडणाऱ्या पुलांचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. कोरोना कालावधीत हे काम रखडले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आता कशेडी घाटातील अवघड व धोकादायक वळणांचा प्रवास टळणार आहे. शिवाय वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *