मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील कोकजेवठार येथे टेम्पो व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या अपघातात दुचाकी चालकासह मागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
रत्नागिरीतून टेम्पो चालक निलेश दत्तात्रेय पोद्दार (वय 28 वर्ष, राहणार कोल्हापूर) हा संगमेश्वरच्या दिशेने जात होता. टेम्पो (क्रमांक MH-09 -FL- 9139) कोकजेवठार येथे आला असता टेम्पो विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH-44 -A- 3809) जोरदार धडक दिली.
देवरुखातून दुचाकी चालक अशोक घुले (वय वर्ष 23 रा.जे के फाईल रत्नागिरी) आणि मागे बसलेल्या राधिका चौरे (वय वर्ष 45 रा. जे के फाईल रत्नागिरी) रत्नागिरीच्या दिशेने येत होते.
या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागला असून मागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















