कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गोवरील जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर पलटी वाहतूक बंद

banner 468x60

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी (ता. शाहूवाडी) खिंडीत रविवारी (दि ३) पहाटे गॅस टँकर पलटी झाला . टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस पोलिसांनी बंद केला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


या अपघातात चालक जाऊल हक ( वय ३५, रा. झारखंड ) हा किरकोळ जखमी झाला आहे. टँकर ( के ए o१ ए एल ८३७९ ) रत्नागिरीहून गॅस भरून बेंगलोरकडे जात होता.


जुळेवाडी खिंडीतील तीव्र वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी झाला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे ते मलकापूर दरम्यानची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली.


मलकापूर-शिरगाव-शिंपे-सरूड-बांबवडे मार्गे तसेच कोकरूड पूलावरून रत्नागिरीकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. शाहूवाडी पोलिसांनी मलकापूर-बांबवडे येथे बंदोबस्त तैनात केला आहे.


दरम्यान, घटनास्थळी मलकापूर नगरपालिकेचा अग्निशामक बंब व १०८ रूग्णवाहिका तैनात केली आहे.


शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पांडव, सुयश पाटील आदी पोलीस कर्मचारीमहामार्म वरून गस्त घालीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *