रत्नागिरी : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यात कोकणकन्येचा हात

banner 468x60

भारताची मान अख्ख्या जगात उंचावणारं इस्रोचं चांद्रयान-३ हे बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. चंद्राच्या दक्षिण धृवावार चांद्रयान-३ ने यशस्वी लँडिंग केलं.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

आजवर कुठलाही देश चंद्राच्या या भागात पोहोचू शकलेला नव्हता. जगाला जे जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं. इस्रोच्या या मोहिमेत महाराष्ट्रातीलही अनेक जण सहभागी होते. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरी येथील अश्विनी विलास जांभळीकर.

रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर ही विद्यार्थ्यांनी इस्त्रोमध्ये काम करीत आहे. भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. फाटक हायस्कूलची ही विद्यार्थिनी आणि ती इस्रोमध्ये काम करते हे वाचून अभिमान वाटावा असंच आहे.

अश्विनी मुळातच हुशार होती. रत्नागिरीतून फाटक हाय स्कूलमध्ये असताना मार्च ९१९१ साली झालेल्या एसएससी परीक्षेत बोर्डाच्या गुणवत्ता यादीत नववी आली होती. चांद्रयान-३ मोहिमेसंबंधात तिचाही सहभागाबद्दल आणि यानाच्या यशस्वी लँडिंग बाबत सर्वच ISRO टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे.

संस्थेला ही बाब अभिमानास्पद आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिमानास्पद ठरलेल्या या चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये या कोकण कन्येचा सहभाग होता. ही मोठी आणि अभिमानास्पद असलेली माहिती रत्नागिरी येथील ज्येष्ठ वकील बाबा परुळेकर यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *