रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न

banner 468x60

कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नाहीअशात आता रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाढवळ्या घडलेल्या एकाघटनेने महिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे

कॉलेज मधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाने ओढून गाडीतखेचण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहेमुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात ही घटनाघडली.

 ट्रकमध्ये खेचताना तरुणीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेततरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर ट्रक चालक फरार झालाअसून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहेया घटनेनंतर खळबळ उडाली आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्तेघाटाच्या पायथ्याशी दिवस ढवळ्या धक्कादायक घटना घडली आहेकॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या एका तरुणीला एका ट्रकचालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला

या झटापटीत त्या कॉलेज तरुणीच्या मानेला आणिगळ्याला दुखापत झालीत्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आलेत्यानंतर त्या ट्रकचालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केलावेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धावघेतली

पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेतरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होतीघडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *