रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये- खोतवाडी येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला जबर मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
मारहाणीची ही घटना रविवारी रात्री १२ ते मंगळवार १८ जुलै या कालावधीत घडली आहे. संतोष शांताराम हरमले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.
त्याच्याविरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती संतोष हा तिच्यावर सतत संशय घेत असतो. यातूनच त्याने १६ ते १८ जुलै या कालावधीत पत्नीला सतत मारझोड करुन दोन्ही डोळ्यांना दुखापत केली आहे.
या मारहाणीत पीडित पत्नीला दोन्ही डोळ्यांनी दिसायचे कमी झाले असून डोक्याला आणि सर्व शरीराला मुका मार लागला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















