रत्नागिरी : वेश्या व्यवसाय चालवणाऱ्याची डायरी हस्तगत, मोठी नावं येणार समोर

banner 468x60

रत्नागिरीत उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालणारा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. यातील संशयिताकडून धक्कादायक माहिती पुढे आली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

ग्राहक म्हणून येणाऱ्या १५० जणांची नावे असलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना याला दुजोरा दिला.पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी हा अनैतिक प्रकार उघडकीस आणला.

या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र रमाकांत चव्हाण याला अटक केली. त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. चौकशीत संशयिताकडे एक डायरी सापडली आहे. यामध्ये सुमारे १५० लोकांचे संपर्क क्रमांक आहेत.

यातील काही क्रमांक राज्यासह परराज्यातील आहेत. या सर्वांची माहिती गोळा केली जाणार आहे. या क्रमांकावरून नेमके काय संभाषण झाले, याचा शोध घेतला जाणार आहे, असे अधीक्षक कुळकर्णी यांनी सांगितले.

१५० लोक नेमके कोण आहेत? रत्नागिरीत हे जाळे पसरलेले आहे का? याबाबत आता नाक्या-नाक्यात चर्चात रंगली आहे. “या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढणार आणि इतर कोण त्यात सहभागी असतील तर सर्वांच्या मुसक्या आवळणार” -धनंजय कुळकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

banner 728x90