मान्सूनने कोकणात धुमाकूळ घातला आहे. रायगडनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे.
कित्येक गावांचा तालुक्याशी संपर्त तुटला आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने पुराच्या पाण्यात झाडाच्या फांदीवर बसून अख्खी रात्र जागून काढली.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली चिंचघर भारजा नदीला आलेल्या पुरात महेंद्र पत्रत नामक व्यक्ती गुरुवारी रात्री वाहुन गेली होती. नदीला खूप मोठा प्रवाह असताना सुदैवाने त्याच्या हाताला फांदी सापडली.
त्याला पकडुन ते झाडावर चडले. अख्खी रात्री या झाडावर बसून काढली. या नदीत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्याही परिस्थितीत त्यांनी झाडाचा आसरा घेत आपले प्राण वाचवले. सकाळी गावातील लोकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.
भारतीय हवामान खात्याने 21 ते 25 जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















