राजापूर तालुक्यातील ओणी अनुस्कुरा मार्गांवर येळवन गावी ग्रामपंचायत जवळ आज सायंकाळी एक अपघात झाला. ज्यामध्ये एक चार चाकी वाहन दरीत कोसळले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याने पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. गाडी नंबर MA-01 CP 7826 ही गाडी चालक प्रशांत गुरव हे मुंबई वरून कणकवली जात असताना चालकाच्या नजरचुकीमुळे हा अपघात झाल्याचे समजते.
चालक प्रशांत गुरव सह, दोन महिला, दोन लहान बालक असे एकूण पाच प्रवाशी या गाडीने प्रवास करीत होते. ग्रामस्थांच्या उपस्थितीत व जेसीबी च्या साहाय्याने सदर वाहन दरितून काढण्यात यश आल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी कोकणात येण्यासाठी साटवली ते विटा जिल्हा सांगलीला जाणारा राज्य महामार्ग आहे, या मार्गाने कोकणात येतात व अनुस्कुरा घाट उतरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी जातात.
यामुळे ओणी अनुस्कुरा या मार्गांवर सध्या जास्त प्रमाणात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे या मार्गांवर छोटे मोठे अपघात होत आहेत. या अपघाताच्या घटनास्थळी पो. कॉ.सुजित पाटील, व पो. कॉ.नंदकुमार गायकवाड, यांनी वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही.
सदर घटना येळवन गावच्या ग्रामपंचायत परिसरात सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान घडली असून तासाभरात वाहन दरीतून रस्त्यावर काढण्यास ग्रामस्थांना यश आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















