ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा काेसळण्यास सुरूवात केली. पावसाच्या संततधारेने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली आहे.
यंदा जून, जुलै महिन्याचे पहिले पंधरा दिवस आणि ऑगस्टमध्ये फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षीही साधारण ३ हजार मिलिमीटर सरासरी एवढा वार्षिक पाऊस पडला होता.
गेल्यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीच्या काळात तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगली मदत केली होती. यंदा जूनच्या शेवटी मान्सूनचे आगमन झाले. मात्र, जुलै महिन्याचे १६ – १७ दिवस पावसाची पाठच होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही फारसा पाऊस पडला नाही.
त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई लवकर भासणार असल्याची भीती व्यक्त होत होती. पाऊस गायब झाल्याने उकाड्यालाही सुरूवात होऊ लागल्याने नागरिक हैराण होत होते. परंतु, एक-दोन दिवसांपासून पावसाच्या सरींना अधूनमधून सुरूवात झाली होती.
गुरूवारी सकाळीही चांगल्या सरी पडल्या. शुक्रवारी पहाटेपासून पावसाने अधिकच जोर घेतला. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यांनतर थोडी विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















