चिपळूण : नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा मोठी अपडेट

banner 468x60

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला असून, आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नीलिमाचा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे तपासात समोर आले होते.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाडला दापोली सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला असून, पंधरा दिवसाचे न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील तपास सुरूच असून नीलिमाने नैराष्येतून आत्महत्या केली असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस तपास पोहोचला आहे.

परंतु, प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांनी कामा संदर्भात दबाव टाकून वारंवार मानसिक त्रास देत असल्याचं तपास दरम्यान उघड झाल्याने संग्राम गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

नीलिमाचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘आपली मुलगी दापोली येथील ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचे सांगितले आहे.

तिच्या कामात नेहेमी 15 दिवसांच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना ही फोन येत होते.’ दरम्यान, नीलिमाचा मृत्यू ही आत्महत्या होती, घातपात झाल्याचा कोणता पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नाही असेही नमूद केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *