चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर ? कुटुंबानं पोलिसांना सांगितलं कर्मचाऱ्याचं नाव, कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू

banner 468x60

नीलिमा चव्हाण मृत्युप्रकरणी विषय रिपोर्ट हा फूड पॉइजन यांनी झाला नसल्याचे वास्तव समोर आले असले तरी आता या प्रकरणात वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

घरच्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता पोलिसांनी नीलिमा चव्हाण ज्या बँकेत काम करत होती त्या बँकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

त्यामुळे आता नीलिमा चव्हाण हिचा बुडून मृत्यू झाला असला तरीही तिला हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यानेच नीलिमा चव्हाण हिने टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचली आहे.

त्यामुळे आता हा मानसिक दबाव नक्की कसला होता याची मोठी माहिती पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणी युद्धपातळीवर पोलीस तपास सुरू आहे. नीलिमा हिच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात मोठी संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे.

तपास यंत्रणा सगळ्या बाजूंनी तपास करत आहेत.या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध असल्याची माहिती अद्याप तरी तपासात समोर आलेली नाही. नीलिमावर असलेला मानसिक दबाव कसला व कोणाचा या दिशेने आता या प्रकरणात पोलिसांनी माहिती घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

स्टेट बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी कर्मचारी तत्त्वावरती असलेली नीलिमा चव्हाण ही डिमॅट अकाउंट उघडणे या संदर्भातील कामांची जबाबदारी निलिमा चव्हाण हिच्यावर होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

खेड चिपळूण दापोली रत्नागिरी या चार शाखांमध्ये डिमॅट ची जबाबदारी हाताळण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत यामधीलच एक निलिमा चव्हाण होती. तसेच कोकण व गोवा डिव्हिजन जबाबदारी असलेला बँकेचा अधिकारी या सगळ्यांचा मुख्य होता अशीही प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

दररोज पाच ते सहा डिमॅट खाती ओपन करणे व जास्तीत जास्त ग्राहकांजवळ संवाद साधून डिमॅट खात्या संदर्भात माहिती सांगणे, नवीन डिमॅट अकाउंट ओपन करणे याची मुख्य जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. मात्र कोकणात दापोली सारख्या शहरात व तालुक्यात डिमॅट खात्यांची इतकी संख्या दररोज नव्याने येणे ही तशी सहज व सोपी गोष्ट नक्कीच नाही.

कारण दापोली येथे ऑनलाइन शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची संख्या लक्षणीय आहे तसेच दापोली येथे अन्य मोठ्या बँकांच्या शाखा आहेत त्यामुळे स्पर्धाही मोठी आहे.मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी या गावची असलेली नीलिमा चव्हाण हिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे एम कॉम पर्यंत तीने शिक्षण घेतले होते.

दापोली इथून गावाकडे निघालेली नीलिमा चव्हाण खेड चिपळूण एसटी बस मध्ये बसली त्यानंतर भरणे येथील जुन्या बंद स्थितीत असलेल्या पुलाकडे ती चालत गेली आणि त्यानंतरच नीलम चव्हाण हिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथम दर्शनी तपासात समोर आले आहे.


या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत शंभरच्याहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,पोलीस उपविभागीय अधिकारी मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बेपत्ता झालेल्या नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीतच मिळाला होता. यावेळी तिच्या डोक्यावर व भुवयांवर केस नसल्याने मोठा संशय निर्माण झाला होता. वैद्यकीय अहवालात तीन दिवसांपेक्षा अधिक मृतदेह पाण्यात राहिल्याने केस हे शरीरापासून वेगळे होऊ शकतात हीच शक्यता दाट असते असं स्पष्ट मत नोंदवण्यात आल आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यानंतर आलेल्या आता व्हीसेरा रिपोर्ट मध्येही नीलिमा हिचा मृत्यू फूड पॉइजन मुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता या प्रकरणात नीलिमा चव्हाण घरच्यांनी पोलिसांकडे एका कर्मचाऱ्याचे नाव पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे. आता त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *