कोकण : बापरे ! गणपतीला कोकणात जाणार 12 लाख चाकरमानी

banner 468x60

गणपतीला कोकणात जाण्यासाठी चाकरमानी सज्ज झाले आहेत.

🔴कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी kokan katta Live.. YouTube:https://youtube.com/@kokankattalive3128?si=UCKBHHfJyBBz0qeCचैनलला subscribe

करा आणि आवडल्यास व्हिडिओ जरूर शेअर करा 👉आपल्याला जाहिरात आणि बातम्या दयायच्या असतील तर संपर्क करा9960151909

रेल्वेसह एस.टी बस., खासगी बस हाऊसफुल्ल झाल्या असून, सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त खासगी व टुरिस्ट लहान गाड्या शुक्रवार, 15 सप्टेंबर रात्रीपासून सोमवार, 18 सप्टेंबर रात्रीपर्यंत कोकणात रवाना होणार आहेत.

विशेष म्हणजे, सर्वच गाड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे 16 सीटर टेम्पो ट्रॅव्हलरसह स्कूल बसही आरक्षित करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे यंदा प्रथमच 12 लाखांहून जास्त चाकरमानी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत कामा-धंद्यानिमित्त कोकणी माणूस राहत असला तरी, त्याची नाळ आपल्या गावाशी जोडलेली आहे. त्यामुळे होळी गणपती मे महिन्यात व अन्य सणाला कोकणी माणूस आवर्जून आपल्या गावी जातो. यात गणेशोत्सवासाठी सर्वाधिक चाकरमानी आपल्या गावी जातात, त्यामुळे या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वे चार महिने अगोदरच तर एस.टी., खासगी बस सुमारे एक महिना आधीच हाऊसफुल्ल होतात. गणपती स्पेशल रेल्वे व ज्यादा एस.टी.ची घोषणा होताच, त्याही अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल होतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मुंबईतून एस.टी. व खासगी बस सोडल्या जातात. पण, यातही अनेकांना जागा मिळत नाही. त्यामुळे काहीच आकारमानी आपल्या खासगी गाड्यांसह टुरिस्ट गाड्या घेऊन, कोकणात जातात. कोरोना महामारीनंतर कोकणात गणपतीला जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या घटली होती. मात्र, यंदा ही संख्या प्रचंड वाढली आहे. काही चाकरमणी गेल्या रविवारपासूनच कोकणात जाण्यास निघाले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *