आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सर्वोच्च स्थान निर्माण करण्यामध्ये चांद्रयान ३ ही मोठी महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी ठरली. यामुळेभारताची शान आणखी उंचावली आहे. चांद्रयान ३ या मोहिमेत कोकणकन्या अश्विनी विलास जांभळीकर या कोकण कन्येचाहीसहभाग होता.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
आता या मोहिमेत कोकण सुपुत्र पार्थ याचाही सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. या मोठ्या मोहिमेत मूळचाकोकणच्या असलेल्या सुपुत्राने सहभाग घेतला होता.मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरतालुक्यात कुंभारखाणी गावचा सुपुत्र पार्थ सुर्वे यांनी चांद्रयान ३ या राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेत उल्लेखनीय सहभाग घेतला.
गेली पाच वर्षे तो इस्त्रोमध्ये कार्यरत असून त्याला चांद्रयान ३ या मोहिमेतही सहभाग घेण्याची मोठी संधी मिळाली. या मोहिमेतरत्नागिरी जिल्ह्यात सहभागी असलेला हा पहिलाच युवक ठरला आहे. पार्थ सुर्वे यांना शिक्षणाचा वारसा हा त्यांच्याआई–वडिलांकडूनच मिळाला आहे.
पार्थ सुर्वे याचे सगळे शिक्षण हे मुंबईत झाले. पार्थ हे मुंबई अंधेरी येथील सेंट डॉमिनिक सॅव्हियोस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. भवन्स कॉलेज अंधेरी येथून बीटेक एरोस्पेस अभियांत्रिकी ही पदवी घेतल्यानंतर IIST त्रिवेंद्रम, VSSC, ISRO त्रिवेंद्रम येथे ५ वर्षे कार्यरत आहेत. पार्थ आता MTch ची तयारी करत आहेत. कोकणात आपल्या मूळ गावीशिमगोत्सव आणि गणेशोत्सव कालावधीत हे कुटुंब आवर्जुन आपल्या गावी येतात.
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी याआपल्या मूळ घरी त्यांचे चुलते आणि अन्य कुटुंब असते. या सगळ्या व्यस्त वेळातही आजही या कुटुंबाची गावाजवळ असलेली नाळघट्ट आहे. पार्थ यांच्या या चांद्रयान ३ मोहिमेची सहभागामुळे ग्रामस्थांसाठीही विशेष अभिमानास्पद बाब ठरली आहे, अशी प्रतिक्रियागावचे उपसरपंच अनिल सुर्वे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन‘ जवळ बोलताना दिली आहे.
वडील अजित हे सुद्धा सायन्स चेविद्यार्थी, Bsc पर्यंत पदवी घेतल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथील नोसील या मोठ्या कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आईमाधवी सुर्वे या महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण आयुक्त विभागाच्या सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*