राजापूर : 22 वर्षे युवकाने व्यसनामुळे केली आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षे युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव आहे. राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते.

त्या दारूच्या व्यसनावरून 6 ऑगस्ट रोजी त्याचे रात्री नऊ वाजल्यानंतर उशिराच्या सुमारास घरी वडिलांजवळ भांडण झाले. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले.

बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली.अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले. ऋषिकेश हा लाँचवर मासेमारीसाठी काम करायचा अशातच आपल्या घरातील मुलाने आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई येथील नायर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याने नायर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अवघे 22 वर्षे वय असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या सगळ्या प्रकाराची नोंद मुंबई येथून राजापूर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.मागील काही काळात वडील, पालकांनी विविध कारणांनी रागावल्याने युवकांचे त्यांच्यासोबत कडाक्याचे भांडण होत आहेत. यातूनच टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत. समाजात होत असलेल्या या बदलामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *