केळंबे लांजा रत्नागिरी येथील यशस्वी कलाकार व उद्योजक निलेश सुवारे यांनी यावर्षी प्रथमच १०० गणपती मुर्ती अमेरिकेत पाठविल्या याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
निलेश सुवारे या कलाकारने यापूर्वी आकाश कंदील अमेरिकेला पाठवून अमेरीकेच्या व्हाइट हाउसवर आपला कंदील लावण्याची इच्छा दाखविली होती.
या दृष्टीने वर्षभर कंदील प्रोडक्शन करून ते अमेरीकेत व इतर ठिकाणी वितरीत होत आहेत. मोठमोठ्या माॅलच्याही ऑर्डर येत आहेत. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याच्या इराद्यामुळेच यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १०० गणपती मूर्ती अमेरिका येथे पाठविण्याचा मनोदय केला होता.
त्यानुसार ट्रायलबेसवर १०० गणपती मुर्त्या अमेरिकेला पाठविल्या आहेत. यामध्ये अनेक टेक्निकल अडचणी आल्या होत्या मात्र बाप्पांच्या कृपेने यातून मार्ग निघून सदर मुर्ती यशस्वीपणे अमेरीकेत दाखल झाल्या आहेत.
या गणपती बाप्पांच्या मूर्तींना उत्तम प्रकारे अमेरीकेत मागणी असून पुढीलवर्षी अजून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सुवारे यांनी सांगितले बेरोजगारी व आर्थिक मंदीच्या कालावधीतही डगमगून न जाता सुवारे यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर तरुण वर्गाला एक आदर्शवत असा मार्ग दाखविला आहे.
सदर व्यवसायात मुंबई येथील दिलीप पाटकर ( पाचल – राजापूर ) व लांजा येथील एकदंत फोटो स्टुडीओ चे मालक अभिजित कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे निलेश सुवारे यांनी सांगितले. दरम्यान, कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे गणपती बाप्पांच्या मखरांचे प्रदर्शन लावून उत्तम दर्जाची व माफक दरातील मकर विक्रीसाठी ठेवले आहेत.
सदर ठिकाणी ग्राहकांनी प्रदर्शन पाहून खरेदी करावी असे आवाहन निलेश सुवारे व त्यांची पत्नी प्राजक्ता सुवारे यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*