कोकण : पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाही, मात्र 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार

banner 468x60

पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे दि.4 पासुन पनवेल येथुन सुटणार असल्याची बातमी कोकण कट्टा लाईव्हने दिली होती मात्र यामध्ये बदल करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway Route) पनवेल-चिपळूण रेल्वेची मेमू (Panvel-Chiplun Railway) अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.

या संदर्भातील आधी दिलेलं वृत्त चुकीचं आहे. कोकण रेल्वे मार्गावर पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) स्वतंत्र मेमू ट्रेन (Memu Train) सोडण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार हे वृत्त चुकीचं असून पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) अशी स्वतंत्र मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे.

13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार
गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे मुंबईहून चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मागील काही वर्षांपासून चिपळूणसाठी स्वतंत्र लोकल श्रेणीतील रेल्वे गाडी सोडण्यात येते.

याही वर्षी 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. दिवा ते चिपळूण मेमू गाडीची दिवा जंक्शन येथून सुटण्याची वेळ सायंकाळी 7:45 अशी होती.

मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी (01155) दिवा जंक्शन येथून दहा मिनिटे आधी म्हणजे सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. तसेच मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.

गणेशोत्सवात दिवा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत झालेल्या या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *