चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हाअपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली.
बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातातकोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीणरुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













