दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यातघेतले.
👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909
हा संशयित पुणे–कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेएटीएसच्या तपासात पुढे आले आहे.
या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्याटप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते.
पुणे–कोथरूडपोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचीमाहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.
त्याची चौकशी केली असता, हादहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे–कुठे होता, याची चौकशी सुरू आहे.
परंतु अजून त्याचेनाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केलीगेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
या प्रकरणाची व्याप्तीवाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते.
कोण आहे सिमाब काझी –
काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावाचा रहिवासी आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो एकानामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. सध्या तो कोंढवा भागात राहायला आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*