कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल, रविवारपासून नवे वेळापत्रक

banner 468x60

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रविवारपासून नव्या वेळेनुसार रेल्वेगाड्या धावतील.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

यात सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, मडगाव – एलटीटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येते.

तसेच नवीन वेळापत्रकात नवीन मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्यात येतात किंवा काही मार्गांवर रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात येते.गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटी येथून रविवारपासून रात्री ११.०५ ऐवजी रात्री ११ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जन शताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीला रविवारपासून रात्री ११.३० ऐवजी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस रविवारपासून रात्री ११.५५ ऐवजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

गाडी क्रमांक १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस एलटीटीला रविवारपासून दुपारी ४.४६ ऐवजी सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १२२२४ एर्नाकुलम – एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस रविवारपासून सायंकाळी ६.१५ ऐवजी सायंकाळी ६.५० वाजता एलटीटीला पोहोचेल.

गाडी क्रमांक १११०० मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस सोमवारपासून एलटीटी येथे रात्री ११.२५ ऐवजी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२११६ करमळी-एलटीटी वातानुकूलित सुपरफास्ट एक्स्प्रेस ५ ऑक्टोबरपासून एलटीटी येथे रात्री ११.२५ ऐवजी रात्री ११.३५ वाजता पोहोचले.

रोहा – दिवा मेमू रविवारपासून दुपारी ४.१५ ऐवजी दुपारी ४.४० वाजता रोहावरून सुटेल. गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी येथून रविवारपासून रात्री १०.०२ ऐवजी रात्री ९.५४ वाजता सुटेल. तसेच एलटीटीवरून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *