सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
बिल्डर सिद्धांत परब यांनी याबाबत तक्रार केली होती. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच घेताना पकडण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रायगड लाच लुचपत विभागाचे पथक कसून चौकशी करत आहे.
खंडागळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांचाही लाच प्रकरणात समावेश आहे. एकाच पोलीस ठाण्याचे दोन प्रमुख अधिकारी पहिले म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर या प्रकरणात सावंतवाडीचे पोलिस उपनिरीक्षक असलेले सुरज पाटील यांचाही यात समावेश असल्याचे कळतेय.
मात्र ते मंत्री महोदय यांच्या दौऱ्यात होते. मात्र, त्यांचा शोध पथक करत आहे .लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. या लाच प्रकरणात आणखीन दोन बडे अधिकारी यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















