कोकण : जास्त भाडं घेताय तर सावधान , जिल्ह्यात 18 खासगी बसेसवर कारवाई

banner 468x60

गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या खासगी बसेसची तपासणी नियमितपणे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून महामार्गावर सुरू आहे .

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

तसेच मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई होत आहे . दोन दिवसात १८ खासगी बसेसवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड करण्यात आला.

नियमबाह्य काही गोष्टी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली . गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मुंबई , पुण्यातून नागरिक दाखल झाले आहेत .

जिल्ह्यात गणेशोत्सव काळात खासगी बसधारकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या .

त्याअनुषंगाने महामार्गावर तपासणी करून कारवाई करण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *