कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यानच्या मार्गाची देखभाल व दुरुस्तीसाठी ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.
👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी संगमेश्वर ते रत्नागिरी असा (रत्नागिरी स्थानक वगळून) तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने तिरुनेलवेली -जामनगर या ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान, सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
याचबरोबर तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (16346) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानका दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













