रत्नागिरी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचवला

banner 468x60

घरगुती वादानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरणे पुलावरून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या महिलेचा जीव वाचवण्याचं मोठं काम जिल्ह्यातील खेड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे.

यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एका बहिणीचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद कार्य पोलीस प्रशासनाने केले आहे. या महामार्गावरील भरणे पुलाच्या दक्षिणेच्या बाजूस रेलिंग वरून संबंधित तरुणी जीव देण्याच्या तयारीत होती.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यामुळे या तरुणीसाठीच नव्हे तर या कुटुंबासाठी उपविभागीय पोलीस हे देवदूत ठरले आहे. या महिलेला वाचवल्यानंतरही तिने पुन्हा एकदा निसटण्याचा प्रयत्न केला,मात्र महिला पोलीस लतिका मोरे यांनी मोठ्या शिताफीने तिला घट्ट पकडले आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाडीत बसवले. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

२९ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मुणगेकर आपल्या स्टाफ सह रत्नागिरी येथे ‘रत्नागिरी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा- २०२३’ च्या ‘सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभ’ या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथे हजर राहण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून सरकारी वाहनाने प्रवास करत होते.

यावेळी त्यांना ‘एक तरुण महिला, भरणे नदी पुलाच्या उत्तर-दक्षिण वाहिके वरील रेलिंग वर चढून जगबुडी नदीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना दिसली. उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड पोलीस स्टेशन राजेंद्र मुणगेकर यांनी या तरुणीला तसे करताना पाहताच आपले सरकारी वाहन तिच्या जवळ वेगाने नेऊन थांबविले आणि लागलीच गाडीतून उतरून

सोबत असलेल्या दोन अंमलदारांच्या मदतीने शिताफीने या महिलेचे दोन्ही हात पकडून तिला रस्त्याच्या सुरक्षित बाजूला आणले. पोलिसांनी गाडीत बसवल्यानंतरही महिला मोठ्याने रडत रडत आपल्याला जगायचे नाही असे सांगत होती.

पोलिसांनी तिला धीर देत तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि कर्मचाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन केले, तिच्या समस्येबाबत विचारपूस करून तिला धीर दिला. तसेच त्या महिलेच्या पतीलाही योग्य प्रकारे समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

व त्यानंतरच खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर रत्नागिरीकडे कार्यक्रमासाठी रवाना झाले. घरगुती कारणास्तव घाबरून जाऊन आणि त्यापासून आपली सुटका होण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन या तरुण महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले होते अशी चौकशी दरम्यान प्राथमिक माहिती समोर आली आहे.

खेड येथील राहणाऱ्या या तरुण महिलेला खेड पोलिसांमार्फत तिच्या नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे. या तरुण महिलेचा प्राण वाचविण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड राजेंद्र मुणगेकर यांच्यासह, पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी बांगर, पो.कॉ. महिला चालक लतिका मोरे यांनी यांनीही मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्यांचे खास अभिनंदन केल आहे.

एका तरुणीचा जीव वाचवण्याची मोठी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या टीमला योग्य बक्षीसही जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *