खेड : खेड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

banner 468x60

खेड रेल्वे स्टेशन परिसर सुसज्ज होणार असून यासाठी ९ कोटी ९० लाख रुपये अर्थसंकल्पीय बजेट मधून मंजूर झाले आहेत. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

मंगळवारी या कामाचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत दूरभाष प्रणालीद्वारे पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग चे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद माजी सभापती अरुण कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, विनोद चाळके, राजूभाई रेडीज, भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, किशोर आंब्रे, भूषण काणे, अनिकेत कानडे, शशांक सिनकर यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खेड रेल्वे स्थानक रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानले जाते. खेड रेल्वे स्थानकाला मंडणगड – दापोली हे दोन तालुके जोडले गेले असून या स्थानकाचे नूतनीकरणाचे काम येत्या काही दिवसातच सुरू करण्यात येणार आहे.

अशी माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंता आशा जाटाळ यांनी दिली. महामार्ग लगत असलेले खेड रेल्वे स्थानक सुसज्ज आणि भव्य दिव्य अशा पद्धतीने साकारण्यात येणार आहे.

या स्थानकाकडे जाताना महामार्ग लगत एक भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार असून, दुसरी स्वागत कमान भोस्ते मार्गे खेड कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणार आहे. तर संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, रस्त्याला अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम तयार करण्यात येणार आहे.

प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था तर मुलांना मनोरंजनासाठी गार्डन तसेच पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत.खेड रेल्वे स्थानकासह रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर या स्थानकांचे देखील नुतनीकरण करण्यात येणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील माणगाव, वीर व कोलाड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ, सावंतवाडी अशा स्थानकांचा यामध्ये समावेश राहणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *