खेड : लाचखोर कर्मचारी अटकेत

banner 468x60

चाप्टर केस मिटवून देतो अस सांगत त्याबदल्यात ३ हजार रुपये मागणी करत ती स्वीकारताना खेड तहसीलदार कार्यालयातील चंपलाल महाजन डेढवाल या महसूल सहाय्यकाला रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

यामुळे खेड महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे चाप्टर केस सुरु आहे.

ती मिटवून देतो असे सांगून यातील खेड तहसीलदार कार्यालयातील आरोपी लोकसेवक चंपलाल महाजन डेढवाल (५२) या महसूल सहाय्यकाणे २८/१२/२०२३ रोजी ३०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने लाच ]लुचपत विभागाकडे संपर्क साधला होता. त्याप्रमाणे सापळा रचत चंपलाल महाजन डेढवाल याला रक्कम ३०००/- रुपये लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *