खेड : तिसंगी येथे भरधाव कारची एसटीला धडक, 3 प्रवासी जखमी

banner 468x60

तालुक्यातील तिसंगी फोजदारवाडी येथे भरधाव वेगतील कारने एसटी बसला ठोकर देऊन अपघात केल्याने या अपघातात बसमधील ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

हा अपघात रविवारी दिनांक ६ रोजी सकाळी ०९:३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, खेड आगारातील चालक आर एस शेवरे हे आपल्या ताब्यातील एस टी बस नंबर एम एच १४ बी टी २५९७ ही खेड ते तिसंगी अशी घेऊन जात असताना

तिसंगी कडून खेडच्या दिशेने भरधाव वेगात येणारी होंडा ओक्टिव्हिया गाडी नंबर एम एच ०२ बी टी ४८२६ वरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने समोर असणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या समोरील बाजूचा चुराडा झाला आहे. या अपघातात एसटी बस मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याअपघाताबाबत खेड पोलिसात एसटी चालकाने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *