खेड : भोस्ते घाटात टँकरचा अपघात

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मुंबईहून लोटे एमआयडीसीच्या दिशेने येणारा केमिकलने भरलेला टँकर घाटाच्या डोंगर कपारीला धडकून अपघातग्रस्त झाला.

त्यामुळे टँकरमधून केमिकलची गळती सुरू झाली व आणि संपूर्ण घाटामध्ये रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण धूर व उग्र वास निर्माण झाला.

गळती रोखण्यात यश आले. या अपघाताची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचा अग्निशमन दल, खेड पोलिस घटनास्थळी पोहोचले. गळती बंद करण्यासाठी एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स कंपनीच्या एक्स्पर्ट टीमला पाचारण करण्यात आले होते.

संपूर्ण घाटामध्ये उग्र वास आणि धूर निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. रसायन भरलेला टँकर लोटे एमआयडीसीच्या दिशेने भोस्ते घाट चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मागील भाग महामार्गाचे संरक्षण कठडा तोडून डोंगराच्या कठड्याला आदळला.

यामुळे टँकरच्या मागील बाजूकडून रसायनची गळती सुरू झाली. त्या ठिकाणी प्रचंड धूर आणि उग्र वास निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत खेड पोलिस, खेड पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *