खेड : शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या काळपावर बिबट्याचा हल्ला

banner 468x60

तालुक्यातील कुळवंडी शिंदेवाडी येथील दगडू शिंदे या शेतकऱ्यांच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या.

अचानक केलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांने ओरडा करुन बिबट्यास पिटाळून लावले. खेड मधील वनखाते अधिकारी वर्गाला याची माहिती नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

banner 728x90 banner 728x90

याबाबत मिळालेली माहिती अशी, खेड तालुक्यातील कुळवंडी शिंदेवाडी येथील शेतकरी दगडू शिंदे यांनी त्यांच्या बकऱ्या कळपाने जंगलमय भागात दिवसा चरायला सोडल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढला होता.

जंगल भागात बकऱ्या चरत असताना बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केला. यात दोन बकऱ्यांना गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार पाहून क्षणाचाही विलंब न करता शेतकरी दगडू शिंदे यांनी ओरडा सुरु केला.

बिबट्याच्या दिशेने हातात काठी आणि झाडाच्या फांद्या घेऊन धाव घेतली. यामुळे बिबट्या घाबरुन पुन्हा जंगलात पळून गेला. मात्र जखमी झालेल्या बकऱ्या घेऊन ते घरी परतले. त्यांनी खासगी वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून उपचार केले. गंभीर जखमी बकऱ्या सध्या गंभीर आहे.

मात्र बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केल्याची माहिती खेडच्या वनविभाग यांना समजली नसल्याने परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील उदरनिर्वाह बकरी पालन करुन चालत आहे.

वनखात्याने या शेतकऱ्याच्या घरी जाऊन चौकशी करुन सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे. या शेतकऱ्यांकडे बकऱ्यांवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याची चर्चा आहे. वनखात्याने त्यांना मदत करावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *