खेड : गांजाची वाहतूक करताना एकाला पकडले 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

तालुक्यातील खवटी येथे शनिवारी दि.२८ रोजी रात्री पोलिसांनी धाड टाकून गांजाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली आहे.

यावेळी गांजासह अन्य साहित्य आढळून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, एक मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ रोजी एक अज्ञात व्यक्ती इको गाडी (क्र. एम.एच. ०८. एएन. ७१५८) या वाहनातून गांजाची वाहतूक सुरू होती.

त्यासोबत पल्सर दुचाकी (एम. एच. ०८. एएस. १६४३) हे वाहन वॉच ठेवण्यासाठी होते. याबाबतची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने दिली. या माहिती आधारे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. पोलिस कर्मचारी श्री. कोरे, श्री. कडू, श्री. ओहोळ हे तुळशी फाटा येथे दबा धरून बसले.

संशयित मोटार त्यांच्या समोरून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाताना त्यांना दिसली. त्या वाहनाचा पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला अनुसया (खवटी) हॉटेलपासून काही अंतरावर जंगलमय परिसरात अडवले.

मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या समारास कार चालकाला ताब्यात घेतले. हे ठिकाण दाट जंगलमय आले. भागात असल्याने पोलिस पथकाने अनुसया हॉटेल-खवटी येथे पंचनामा केला. यावेळी ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचे नाव रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिध्दार्थ नगर, मुक्ताबाई हॉस्पिटल, भटवाडी, घाटकोपर बेस्ट, मुंबई) असे असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्या ताब्यातील इको व्हॅन (एम. एच. ०८ ए. एन. ७१५८) याची झडती घेतली

असता त्याच्या खिशात तीन मोबाइल व रोख रक्कम आढळून तसेच वाहनात एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा हा अमली पदार्थ व प्लास्टिक छोट्या पॅकिंगच्या पिशव्या असे साहित्य आढळले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुद्देमालामध्ये पाच लाख रुपये किमतीच्या इको व्हॅनसह लाखो रुपयांचा अमली पदार्थ ताब्यात घेतला आहे. संशयित इसमाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *