खेड : कशेडी घाटात एसटीचा ब्रेक डाऊन!वाहतूकीचा खोळंबा

banner 468x60

परतीचा चाकरमान्यांच्या प्रवास सुरु झाला असून कशेडी घाटातून प्रवास करताना अनेक एसटी महामंडळाच्या बसेस ब्रेक डाऊन होत आहेत. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होत आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

रविवार पासून हा प्रकार सतत घडत असल्याने कशेडी येथील वाहतूक पोलीस यंत्रणेवर खूप ताण येत आहे.


मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून प्रवास करताना मुंबईहून येणाऱ्या वाहनांना पर्यायी एकेरी बोगद्यातून प्रवास करता येतो.

मात्र परतीच्या प्रवासाला कशेडी घाटातील नागमोडी वळणे आणि बिकट प्रवास करत पुढे जावे लागते. त्यामुळे अनेक चाकरमानी परतीच्या प्रवासाला कंटाळून गेले आहेत. अनेक वाहने बंद पडत असल्याने तिथे वाहतूक कोंडी होत असते.

अनेक वाहने तिथल्या तिथं अडकून पडतात. त्यानंतर महामार्ग पोलीसांना वाहतूकीवर नियंत्रण करावे लागत आहे. रात्री अपरात्री हे प्रकार सातत्याने घडत आहेत. रविवारी एकाच वेळी अनेक वाहने मुंबईच्या दिशेने निघाली होती. कशेडी बोगदा परतीच्या प्रवासाला बंद होता.

तेव्हा महामार्गावरची वाहतूक कशेडी घाटातील जून्या रस्त्याने पुढे जात होती. त्यावेळी रात्री काळोखात जवळपास पाच एसटीच्या बसेस घाटात ब्रेक डाऊन झालेल्या होत्या. त्यामुळे ठिकठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती.

रात्री दहा वाजल्यापासून ते पहाटे तीन पर्यंत ही कोंडी झालेली होती. वाहतूक पोलीस वाहनांना मिळेल तिथून रस्ता काढून पुढे मार्गस्थ करत होते.

परंतु एकाच वेळी अनेक एसटी बस ब्रेक डाऊन झाल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. सोमवारी, रात्री हाच प्रकार सतत घडत होता. त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीने वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत.

रात्री अपरात्री एसटी महामंडळाचे मेकॅनिकसह अधिकारी वेळेवर हजर होतं असले की खूप अडचण येत असते, हे दिसून आलं आहे.

एकेरी वाहतूक व्यवस्था केली तर, वाहनचालक अधुनमधून वाहने घुसवून पूर्ण वाहतूकीचा खोळंबा करतात. हा खोळंबा सोडवताना दोन ते चार तास जातं असतात. हा प्रकार घाटात रोजचाच झालेला असून वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *