खेड : चोरट्याने दुकान फोडले

banner 468x60

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बसस्थानकाच्या मागील सुपर मार्केट मध्ये मोहीमतुले झेरॉक्स सेंटर सोमवारी दि. ११ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे.

 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातील दहा ते अकरा हजार रुपयांची रोकड चोरून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरात भरवस्तीत मोहीमतुले झेरॉक्स सेंटर या ठिकाणी ही चोरी झाली आहे.सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेले मालक जलाल मोहिमतुले यांना दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले दिसले.

त्यानंतर खेड पोलिसांना मोहीमतुले यांनी कळवल्यानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *