Kokan  

खेड : ‘तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’ अशी बतावणी करत 50 लाखांची फसवणूक

banner 468x60

‘तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’, अशी बतावणी करत भरणे गणेशनगरमधील एका कुटुंबातील व्यक्तींची तब्बल ४० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबासह (स्वामी) अन्य दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार १ मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला. प्रसाद हरिभाऊ जाधव (स्वामी) (वय ४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), विवेक यशवंत कदम (वय ४८, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा), ओंकार विकास कदम (वय २३, करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.

banner 728x90 banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याची तक्रार विठाबाई आण्णाप्पा पवार (वय ४८) रा. भरणेनाका, गणेशनगर) यांनी दिली. या प्रकरणी मिळलेल्या माहिती अशी, गुप्तधन काढून देतो, असे खोटे सांगून फिर्यादी यांच्या घरात मंत्रतंत्र वाचून पूजापाठ, होमहवन केले.

त्याचे नातेवाईकांकडून प्रसाद यांनी पूजापाठ करण्यासाठी ४० लाख ६५ हजार रुपये आणि फिर्यादीचा मुलगा रोहित यांच्या ग्रहशांतीसाठी २५ हजार रुपये, असे एकूण ४० लाख ९० हजार रुपये घेतले.

संशयित आरोपीच्या सोबत आलेल्या विवेक कदम व ओंकार विकास कदम (दोन्ही रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) यांनी संगनमताने फसवणूक केली.

या प्रकरणी येथील पोलिसात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (१), २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *