तालुक्याचे दापोली व गुहागर अशा दोन मतदार संघात विभाजन झाले असले तरी देखील तालुक्याचा विकास हेच ध्येय समोर ठेवून शिवसेना काम करत आहे.
खेड तालुक्यातील गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या ५२ गावांमध्ये ३५ कोटी रुपयांची विकासकामे राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्यात यश आहे आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
गुहागर मतदार संघातील ५२ गावांमध्ये ३५ कोटींचा विकासनिधी आम्ही मंजूर करून घेण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामध्ये गुहागर मतदार संघात ३५ कोटी ८६ लक्ष ७६ हजार निधीतून २९६ विकासकामे केली जाणार आहेत.
खेड तालुक्यातील साखर, शिर्शी, कोरेगाव, निगडे, अणसपुरे, तळवट खेड, कुरवळ जावळी, भेलसई, वावेतर्फे खेड, कासई, सपिली, काडवली, तळवट पाल, चोरवणे, निवे, धामणंद, मुसाड, बहिरवली, लवेल, शेल्डी, मेटे, कर्जी, सवणस, तुंबाड, होडखाड, राजवेल, भोस्ते, शिव, आयनी , खोपी, मिर्ले, जांबुर्डे, निळीक, शिरगाव, दयाळ, मुंबके, दाभिळ, कावळे, पोसरे, गुणदे, संगलट आदी ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण २१ कोटी ४ लाख २२ हजार रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून खेड तालुक्यातील गुहागर मतदार संघात समावेश झालेला भाग विकासापासून दुर्लक्षित झाला होता; मात्र आता या विकासनिधीतून या भागात नक्कीच विकासाला चालना मिळेल.
गुहागर मतदार संघात समावेश असलेल्या खेड तालुक्यातील गावांच्या विकासासाठी हा ३५ कोटी ८६ लक्ष ७६ हजार रुपयांचा निधी असून, या मतदार संघातील गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील इतर गावांसाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे, स्मशानभूमी बांधणे, प्रमुख जिल्हा मार्ग डांबरीकरण, गावांतील मुख्यरस्ते डांबरीकरण, पाखाडी, स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते मजबुतीकरण, बंदिस्त गटार बांधकाम, स्मशानभूमी कंपाऊंड वॉल, साकव बांधणे, समाजमंदिर बांधणे, सभामंडप बांधणे, विहिरी बांधणे, धोबीघाट बांधणे, पाण्याची टाकी बांधणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकास कार्यक्रम आदी विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*