मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर ची दोन वाहनांना धडक बसली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या अपघातात पाच जणांना दुखापत झाली आहे. तर तीन ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई – गोवा महामार्गावर भोस्ते घाटात गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या कंटेनर (एम एच १६ बी.सी. ६०५०) वरील चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनरने पुढे चाललेल्या सुमोला (एम. एच. ०६ ए. एस. ७४२१) पाठीमागून धडक दिली.
सुमोला कुडाळ येथून बेलापूरच्या दिशेने जात होती. सुमोला कंटेनर ची धडक बसल्या नंतर सुमोच्या पुढे चाललेल्या मालवाहू छोट्या टेम्पोला (एम एच ०६ बी डबल्यू ३३११) सुमोची धडक बसली. यावेळी टेम्पो रस्त्याच्या बाजूला उलटला
टेम्पो चालक शमसुद्दिन खान व त्याचा एक सहकारी महाड येथून चिपळूण येथे झाडू विक्री करण्यासाठी आले होते. झाडू विक्री करून चिपळूण येथून महाडच्या दिशेने ते निघाले होते.
या अपघातात टेम्पो चालक व त्याच्या सहकाऱ्याला दुखापत झाली आहे. तीन वाहनांच्या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाला नसला तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुमो व टेम्पो यांना धडक दिल्यानंतर कंटेनर मुंबई – गोवा महामार्गाच्या दुभाजकावर धडकला आहे. अपघातस्थळा वरुन कंटेनर चालकाने पलायन केले आहे. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*